विभागनिहाय प्रभाग समिती स्थापन करण्याची मनसेची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विभागनिहाय प्रभाग समिती स्थापन करण्याची मनसेची मागणी

Share This

मुंबई : पालिकेच्या प्रभाग समित्यांच्या कामकाजात सुसूत्रता आणून त्यांचा कारभार जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी विभागनिहाय प्रभाग समिती स्थापन करण्याची मागणी मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी ठरावातील सूचनेद्वारे केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांचा दैनंदिन कारभार जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावा आणि अधिकारांचे विकेंद्रीकरण व्हावे, या हेतूने भारताच्या संविधानामध्ये 74 व्या घटनादुरुस्ती अन्वये मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1988 मध्ये सुधारणा करून 50 टीटी हे नवीन कलम अंतर्भूत करण्यात आले. त्यानुसारच मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये 16 प्रभाग समित्यांची स्थापना केली गेली. मात्र प्रभाग समित्यांमधील कारभाराचे विकेंद्रीकरण मर्यादित झाले आणि प्रशासकीय पातळीवरील अधिकारात वाढ झाली.ही वस्तुस्थिती लक्षात घेता प्रभाग समितीच्या कामाचे विकेंद्रीकरण होईल आणि घटना दुरुस्तीचे फलीत साध्य होण्यासाठी प्रभाग समितीच्या कामकाजात सुसूत्रता आणून त्यांचा कारभार जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी विभागनिहाय प्रभाग समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी दिलीप लांडे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages