मुंबई / ( केतन खेडेकर )
महिलांवर होणार्या अत्याचारांविरोधात महिलांनी स्वत:च लढले पाहिजे. देशाची प्रगती ही स्त्रियांच्या खांद्यावर आहे. वेदना घालविण्यासाठी महिलेचा जन्म झाला असल्याची भावना सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केली.
आझाद हिंद सवरेत्कर्ष मंडळ यांच्या वतीने स्त्रियांवर होणार्या अत्याचारांविरोधात सिंधूताई सपकाळ यांच्या मुलाखतीचे परळ येथील लाल मैदानात आयोजन करण्यात आले होते. या वेळी सिंधूताई सपकाळ यांनी त्यांच्या आयुष्यातील अनंत सकंटांवर मात करून केलेला जीवनाचा प्रवास उलगडला.
आजही रेल्वे स्थानकावर लहान मुले, महिला यांचा शोध घेत त्यांना आसरा देत असल्याचे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, पूर्वी रेल्वे स्थानकांवर गाणी गात उदरनिर्वाह करीत असे. सध्या अडचणींमध्ये सापडलेल्या लहान मुलांना स्वत:च्या संस्थेत सामील करून घेते आणि आजही या मुलांच्या दूधासाखरेसाठी पैसे गोळा करीत असते.
केईएम रुग्णालयाच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ शुभांगी पारकर म्हणाल्या की, पुरुषांना लागलेले व्यसन सोडविण्यास कुटुंब प्रचंड धडपड करते; मात्र महिलांचे व्यसन सोडविण्यासाठी त्यांनी स्वत: जागरूक राहिले पाहिजे. त्यामुळे स्त्रियांची सुरक्षितता कुटुंबापासून सुरू होते, मात्र आता त्याचे प्रमाण घटले असल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.
महिलांवर होणार्या अत्याचारांविरोधात महिलांनी स्वत:च लढले पाहिजे. देशाची प्रगती ही स्त्रियांच्या खांद्यावर असल्याने देशाची वेदना घालविण्यासाठी महिलेचा जन्म झाला असल्याची भावना ज्येष्ट सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment