मुंबई : बुधवारच्या 'भारत बंद'साठी मुंबई पोलिसांनी सुरक्षिततेचे व्यापक उपाय योजले आहेत. बंदनिमित्त शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून राज्य राखीव दलाच्या 20 तुकडय़ा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सहा कंपन्या तसेच शीघ्र कृती दलाच्या चार तुकडय़ा शहराच्या विविध भागांत तैनात करण्यात आल्या आहेत. बंदला तोंड देण्यासाठी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या कार्यालयात बडय़ा अधिकार्यांची एक बैठक घेतली. या बैठकीत 'बंद'निमित्त कोणती काळजी घ्यावयाची याची चर्चा झाली. शहर पोलिसांच्या मदतीला निमलष्करी जवानांच्या तुकडय़ा आणण्यात आल्या आहेत.
दोन दिवसांच्या या औद्योगिक बंदला तोंड देण्यासाठी पोलिसांनी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. बस, रिक्षा व टॅक्सी यावर दगडफेक करणार्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे. शहरात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. हमरस्त्यांवर पोलिसांची फिरती गस्त ठेवण्यात आली असून समाजकंटकाच्या धरपकडीला प्रारंभ झाला आहे. राज्यातील प्रमुख संघटनांचा या बंदला फारसा पाठिंबा नसल्याने हा बंद किती यशस्वी होईल, याबाबत पोलीस साशंक आहेत; पण खबरदारी म्हणून बंदोबस्त चोख ठेवणे हे पोलिसांचे काम असल्याने कोणताही धोका पत्करण्यास पोलीस तयार नाहीत.
Post Top Ad
20 February 2013
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment