मुक्त विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 February 2013

मुक्त विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु


मुंबई - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पूर्व तयारी शिक्षण क्रमाचे प्रवेश सुरु असून हे प्रवेश २८ फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार आहेत. १० वी १२वी नापास विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी , इंग्रजी व उर्दू अशा चार भाषांमध्ये हि परीक्षा देता येणार आहे. मुंबई मधील ७० अभासकेंद्रांवर प्रवेशप्रक्रिया सुरु असून १५ फेब्रुवारी पर्यंत नियमित फी द्वारे तर १५ फेब्रुवारी नंतर २८ फेब्रुवारी पर्यंत विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना प्रवेश घेत येणार आहे. सदर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना बी. ए., बी. कॉम, तसेच विद्यापीठाद्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेत येणार आहे. याबाबत अधिक माहिती साठी २३८७४१८६ / ८७ या क्रमांकावर संपर्क साधावा किवा http://ycmou.digitaluniversity.ac या संकेत स्थळाला भेट द्यावी असे आवाहन मुंबई विभागीय संचालक प्रकाश देशमुख, व श्रीनिवास बेलसरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad