रंगांचा बेरंग झाल्याने १०० हून अधिक रुग्णालयात दाखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रंगांचा बेरंग झाल्याने १०० हून अधिक रुग्णालयात दाखल

Share This

होळीचा आनंद लुटताना रंगांचा बेरंग झाल्याने १०० हून अधिकजणांना आज रुग्णालय गाठावे लागले. कुणाला रंगांमुळे त्रास झाला, तर कुणाला भांगेमुळे. धारावीमध्ये तर एका मुलीने गुलाबजाममधून भांग खाल्ल्याने तिला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धुळवड खेळताना रंगांमुळे डोळे व त्वचेला इजा होणे, अतिमद्यपान, भांग जास्त पिणे, धुळवडीतील हाणामारीत किरकोळ जखमी होणे असे १००हून अधिकजणांना केईएममध्ये उपचारासाठी नेण्यात आले. त्यातील १२ जणांच्या डोळ्यात रंग गेल्याने त्यांना त्रास झाला होता. उपचार केल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. नायर रुग्णालयातही रंगबाधा झालेल्या ११ जणांवर उपचार केले गेले. 

माटुंगा येथील यूआयसीटी संस्थेतील ७ विद्यार्थ्यांनी धुळवडीनिमित्त भांग प्यायल्याने अस्वस्थ वाटू लागले. भूमिला पाठक, स्मिता शंकर, करण देवकर, शरद विजाली, विशाल साळुनकर, शैलेंद्र राजपूर आणि आशीष यादव नावाच्या या विद्यार्थ्यांना उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल केले. तर धारावीतील सोनाली खंदारे या मुलीने गुलाबजाममधून भांग खाल्ल्याने तिलाही शीव रुग्णालयात दाखल केले गेले. बोरीवलीच्या भगवती रुग्णालयात १२जणांवर उपचार केले गेले. तसेच कर्णावती एक्सप्रेसमधील प्रवाशाने प्लास्टिकची पिशवी फेकून मारल्याने लोकलमधील बाप्पी साहू हा तरूण जखमी झाल्याची घटना जोगेश्‍वरी येथे घडली

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages