बिनीता वोरा यांचे नगरसेवकपद धोक्यात! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बिनीता वोरा यांचे नगरसेवकपद धोक्यात!

Share This

मुंबई - विलेपार्ले प्रभाग क्र. ६५ च्या नगरसेविका बिनीता मेहुल वोरा यांनी आपल्या कुंजविहार येथील निवासस्थानी उभारलेल्या ‘वन शॉप’ शोरूममध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे उघड झाले. चार हजार चौरस फुटांचे हे अनधिकृत बांधकाम न्यायालयाच्या निर्देशानंतरही तीन वर्षे हटवण्यात आलेले नाही. याबाबत शिवसेना विभागप्रमुख आमदार अनिल परब आणि उपविभागप्रमुख जीतेंद्र जानावळे यांनी आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेऊन अनधिकृत बांधकाम हटविण्याची त्याचप्रमाणे बिनीता वोरा यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली आहे.

बिनीता वोरा राहत असलेल्या कुंजविहार या निवासस्थानी असलेल्या गॅरेजमध्ये वन शॉप नावाचे शोरूम अनधिकृतरीत्या उभारल्याप्रकरणी पालिकेच्या के-पश्‍चिम विभागाकडून नोटीसही बजावण्यात आली. न्यायालयानेही २०११ सालीच हे बांधकाम तोडण्याचे आदेश दिले, मात्र के/पश्‍चिम विभागातील इमारत व कारखाने सहाय्यक अभियंत्यांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असे जानावळे यांनी सांगितले.

पालिका अधिनियमानुसार कारवाईसदर मालमत्ता ही बिनीता वोरा यांचे पती मेहुल वोरा यांच्या मालकीची असल्याचे समजते. मात्र पालिका अनिनियमानुसार नगरसेवक किंवा त्यांच्या नातेवाईकांनी अनधिकृत बांधकाम केले असल्यास नगरसेवकपद रद्द होते. त्याचप्रमाणे दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवलेला उमेदवार नगरसेवक म्हणून येऊ शकतो. त्याचप्रमाणे दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवलेला उमेदवार नगरसेवक म्हणून येऊ शकतो.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages