मंत्रालयामध्‍ये पुन्‍हा आग - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मंत्रालयामध्‍ये पुन्‍हा आग

Share This
मुंबई /  http://jpnnews.webs.com
मंत्रालयाच्‍या चौथ्‍या मजल्‍यावर दुपारी 12 वा. आग लागली असून मोठी खळबळ उडाली आहे. मंत्रालयाच्‍या विस्‍तारित इमारतीच्‍या चौथ्‍या मजल्‍यावर आग लागली. धुराचे मोठे लोट दिसून आले. त्‍यानंतर लगेच अग्निशमन दलाचे बंब मंत्रालयात दाखल झाले असून आग विझविण्‍याचे आग आटोक्‍यात आणण्‍यात यश मिळाले आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, चौथ्‍या आणि पाचव्‍या मजल्‍यावर वेल्‍डींगचे काम सुरु होते. हे काम सुरु असतानाच ठिणगी पडल्‍यामुळे आग लागल्‍याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्‍याच वर्षी मंत्रालयाला मोठी आग लागली होती. मंत्रालयाच्‍या मुख्‍य इमारतीच्‍या पाचव्‍या आणि सहाव्‍या मजल्‍यावर आग लागली होती. हे मजले खाक झाले होते. सध्‍या येथे नुतनीकरणाचे काम सुरु आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages