बेस्ट बसगाड्यांच्या बिघाडांच्या संख्येत घट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट बसगाड्यांच्या बिघाडांच्या संख्येत घट

Share This
मुंबई / jpnnews.webs.com
मुंबईच्या रस्त्यावर धावणार्‍या बेस्ट या मुंबईकरांची सेकंड लाईफलाइन मानल्या जातात. गेल्या काही महिन्यांमध्ये रस्त्यावर बेस्टच्या बसेस बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती, परंतु बेस्ट प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे सध्या बेस्टच्या बसेस बंद पडण्याचे प्रमाण खूपच कमी झाले असून ते १३0 वरून ९६ एवढे खाली आहे आहे.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये २0१0 साली सुमारे १000 नवीन सीएनजी बसगाड्यांची भर पडल्याने या वाढीव बसताफ्याच्या तुलनेत कामगारांची संख्या आणि आगारातील पार्किंगची क्षमता अपुरी पडली होती. तसेच आगारांमधील सीएनजी इंधन भरणा केंद्रांची संख्या कमी असल्याने आणि सीएनजी बसगाड्यांचे तंत्रज्ञानही नवीन असल्याकारणाने बसगाड्यांच्या बिघाडाचे प्रमाण वाढले होते. परंतु बेस्ट प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन बिघाडांचे प्रमाण कमी करण्याकरिता आयुर्मान पूर्ण केलेल्या बसगाड्या मोडीत काढणे, बसताफा अनिर्बंधित करणे, बसगाड्यांवर शक्यतो स्वदेशी सुट्टे भाग बसविणे, कामगारांची संख्या वाढवून अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे, आगारांमध्ये सीएनजी इंधन भरणा केंद्रांची संख्या वाढवणे, तांत्रिक सुधारणा केल्या. 

तसेच नवीन चिंचोली बस आगाराचे काम वेगाने पूर्ण करण्याचे प्रय▪सुरू असून कुर्ला बस आगाराच्या पुनर्विकासाचे कामदेखील प्रगतीपथावर आहे. सध्याच्या घडीला बेस्टच्या ताफ्यात सुमारे ४४00 बसेस आहेत. त्यापैकी सुमारे २000 बसेस सीएनजीवर आहेत. उर्वरित या डिझेलवर चालणार्‍या आहेत. परिवहन अभियांत्रिकी विभागाने केलेल्या अथक परिश्रमामुळे बसगाड्या नादुरुस्त होण्याचे दैनिक सरासरी प्रमाण १३0 वरून ९६ एवढे खाली आले आहे. उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा आणि सामग्रीचा वापर करून बस प्रवर्तनामध्ये सातत्याने सुधारणा करणे, तसेच प्रवाशांना विनाबिघाड आणि अपघातविरहित उत्तम सेवा देण्याकरिता बेस्ट प्रशासन कटिबद्ध असल्याचे बेस्टतर्फे कळवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages