दुष्काळ निवारणात सरकार असंवेदनशील - आंबेडकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दुष्काळ निवारणात सरकार असंवेदनशील - आंबेडकर

Share This

गेली साठ वर्षे राज्यात व केंद्रात सत्तेवर असणार्‍या पक्षाने व राजकारण्यांनी दुष्काळ निवारणासाठी नेमके काय केले? असा सवाल रिपब्लिकन सेनेचे नेते अँड़ आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. इंदू मिल लढा प्रकरणातून पुढे आलेले आनंदराज आंबेडकर यांनी रविवारी नांदेड येथील तपोवन शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. मराठवाडा, विदर्भासह अनेक ठिकाणी भीषण दुष्काळ पडलेला आहे. पिण्याचे पाणी, जनावरांना चारा नाही, बादलीभर पाण्यासाठी महिला, मुले, मुली एक-दोन किमीची पायपीट करीत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहावयास मिळत आहे. शासन दुष्काळ निवारणाबाबत मुळीच गंभीर नसल्याने संताप व्यक्त होत आहे. गेली साठ वर्षे राज्य आणि केंद्रात सत्ता उपभोगणारा पक्ष आणि राजकारण्यांनी दुष्काळ संपविण्यासाठी काहीच केले नसल्याने आज ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप करीत आनंदराज म्हणाले की, सिंचनाच्या नावावर मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला आणि त्याची कटुफळे जनतेला भोगावी लागत आहेत. दुष्काळ निवारणासाठी सरकार गंभीर नसल्याचे दिसून येते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages