एप्रिल महिन्यात एसटी कर्मचार्‍यांचे चक्का जाम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एप्रिल महिन्यात एसटी कर्मचार्‍यांचे चक्का जाम

Share This
मुंबई / http://jpnnews.webs.com :
एसटी कामगारांना २२.५0 टक्केवेतनवाढ मिळावी, या मागणीसाठी राज्यातील एक लाख चार हजार एसटी कर्मचारी एप्रिल महिन्यात चक्का जाम करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. परिणामी, उन्हाळी सुट्टीत गावी जाणार्‍या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत.

एसटी कामगारांना २0१२ ते १६ या कालावधीसाठी होत असलेल्या वेतन कराराबाबत राज्य सरकारने नुकताच निर्णय जाहीर केला; परंतु या निर्णयात कामगारांना केवळ १0 टक्केच वेतनवाढ अपेक्षित धरली होती, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी दिली. ही वेतनवाढ न झाल्याने कामगारांमध्ये नाराजी आहे. तसेच १0 टक्केवेतनवाढीमुळे नियमित वेतनश्रेणी कामगारांच्या वेतनात वाढ होणार नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. परिणामी, वेतन कराराच्या मसुद्यामध्ये संघटनेच्या अपेक्षांची पूर्तता न झाल्यास वेतन करारावर संघटना स्वाक्षरी करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages