'झालाच पाहिजे' ठरल्या दिवशीच महाराष्ट्रात होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'झालाच पाहिजे' ठरल्या दिवशीच महाराष्ट्रात होणार

Share This
मुंबई : महाराष्ट्रातील कर्नाटक संघटनांकडून सीमाप्रश्नावरील मराठी नाटक 'झालाच पाहिजे'ला विरोध दर्शविला आहे. महाराष्ट्र दिनी रंगमंचावर येणार्‍या या नाटकात सीमाप्रश्नावर भाष्य असून, सीमावासीयांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न यात आहे. हे नाटक नाट्यसंपदा निर्मित असून नीतेश राणे यांची 'महाराष्ट्र कलानिधी' प्रकाशित करत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील कर्नाटक संघटनांकडून याबाबत दोन पत्र नाट्यसंपदेचे निर्माता अनंत पणशीकर यांना प्राप्त झाली असून, नाटक सादर झाल्यास रस्त्यावर उतरण्याच्या धमक्या यात देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र कलानिधीचे मुख्य प्रवर्तक नीतेश राणे यांनी प्रथमच यासंदर्भात पत्रकारांसमोर आपली बांजू मांडली. नाटक ठरल्याप्रमाणे, ठरल्या दिवशी महाराष्ट्रात तर होणारच आहे. मात्र सर्व विरोध झुगारुन ते सीमाभागात देखील करण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार त्यांनी या वेळी केला. आमची संघटना खंबीरपणे 'झालाच पाहिजे' च्या पाठीशी उभी आहे. हिंमत असेल तर अडवून दाखवा, असा सज्जड दमच त्यांनी महाराष्ट्रातील कानडी संघटनांना दिला. महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि येथे काय करायचे ते येथील मराठी माणूसच ठरवेल. विरोध करायला आलेले परत जाणार नाही, हे मात्र नक्की. विरोध करणार्‍यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा खणखणीत इशाराही राणेंनी दिला. नाटकाला होणारा विरोध हा कर्नाटकात तिथल्या भूमिपुत्रावर होणारा अत्याचार आणि अनन्वित छळ याचेच ध्योतक आहे, हा विरोध न जुमानता आम्ही नाटक सादर करणारच अशी पुस्ती नाटकाचे निर्माते अनंत पणशीकर यांनी या वेळी दिली

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages