मिठी नदीतील गाळ काढण्याची जबाबदारी एमएमआरडीएची - शेवाळे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मिठी नदीतील गाळ काढण्याची जबाबदारी एमएमआरडीएची - शेवाळे

Share This
मुंबई : मिठी नदीतील गाळ काढणे, ही मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाची (एमएमआरडीए) जबाबदारी आहे. मात्र एमएमआरडीए याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. मिठी नदीतील गाळ काढण्यात आला नाही आणि त्यामुळे येत्या पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास एमएमआरडीए जबाबदार राहील, असे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मिठी नदी परिसरातून पालिका मालमत्ता कर वसूल करीत असल्याने गाळ पालिकेने काढावा, अशा अविर्भावात एमएमआरडीए आहे. त्यामुळे पालिकेचे फार नुकसान होणार आहे. अशाप्रकारे एमएमआरडीए आपली जबाबदारी पालिकेवर ढकलण्याचा प्रय▪करीत असल्याचे स्थायी समितीतील सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. परिणामी हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करावा लागल्याचे स्पष्ट करीत शेवाळे यांनी एमएमआरडीए विकासात अपयशी ठरत असल्याचे पत्रात म्हटले आहे. मुंबईत सात वर्षांपूर्वी आलेल्या महापुरापासून मिठी नदीतील गाळ कोणी काढायचा, असा वाद सुरू झाला आहे. या कामात एमएमआरडीए आणि पालिका या दोन्ही यंत्रणांचा संबंध आहे. यंदा स्थायी समितीसमोर जे प्रस्ताव आले होते, त्याची किंमत पालिकेने अदा करावी, असे प्रशासनाचे म्हणणे होते. मात्र या कामाचे पैसे दिल्याशिवाय मिठी नदीतील गाळ काढण्यात येऊ नये, अशी भूमिका सदस्यांनी घेतल्याने हा प्रस्ताव दफ्तरी दाखल केल्याचे शेवाळे यांनी म्हटले. त्यामुळे यंदा तरी गाळ काढण्याची किंमत एमएमआरडीएने अदा करावी, असे स्थायी समितीचे म्हणणे असल्याचे शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages