संविधानामुळेच भारत एकसंध - आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

संविधानामुळेच भारत एकसंध - आठवले

Share This
मुंबई : भारतात विविध पंथ, जाती आणि धर्म आहेत. भाषा आणि चालीरीतींची विविधता असूनही भारत एकसंध उभा आहे. परकीय शक्तींनी कितीही प्रयत्न केले तरी देशाची एकसंधता कोणी तोडू शकणार नाही. हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी वरळी कोळीवाडा येथे आयोजित भीमजयंती उत्सवात केले. 

महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे कष्टकरी कामगार-मजुरांना पगार मिळाला पाहिजे. गोरगरीबांना मोफत औषधोपचार मिळाला पाहिजे. सरकारी रुग्णालयात महागडी औषधे गरीबांना मोफत उपलब्ध झाली पाहिजेत. ज्या भागात जास्त पाऊस पडेल, त्या भागात पाणी अडवून ते नद्यांना जोडावे आणि ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागात वळवावे, असे मत व्यक्त करून लोकनेते रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या भल्यासाठी केलेल्या कायद्याच्या तसेच त्यांनी देशाला सांगितलेल्या जल नियोजनाची माहिती या वेळी दिली. वरळी कोळीवाड्यानंतर माटुंगा लेबर कॅम्प, जोगेश्‍वरी, मेघवाडी आणि वांद्रे गांधीनगर, येथील भीमजयंती उत्सवाला आठवले यांनी भेट दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages