दिल्लीतली घटना लज्जास्पद - ओम पुरी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दिल्लीतली घटना लज्जास्पद - ओम पुरी

Share This

मुंबई : दिल्लीत पाच वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेला ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी 'लज्जास्पद' असे संबोधले आहे. समाजातून सामाजिक मूल्यांचाच र्‍हास होत चालल्याची टीका त्यांनी या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर केली आहे. आपण भारताच्या भूमीला गांधी तसेच बुद्ध यांची भूमी म्हणवतो; परंतु आता बुद्ध आहेत कुठे, तसेच आहेत कुठे गांधी असा सवालही ओम पुरी यांनी केला आहे. भगत सिंग, राजगुरू, सुखदेव या देशभक्तांनी देशासाठी प्राण दिले. त्यांचे हे सर्मपण वाया गेले का, आपण खर्‍या अर्थाने स्वतंत्र झालो आहोत का असा सवालही अगदी उद्विग्नपणे ओम पुरी यांनी विचारला आहे. बलात्कार संदर्भातल्या बातम्या वाचल्यानंतर माझ्या मनाला वेदना तर झाल्याच; परंतु मला स्वत:ला लज्जास्पद असा अनुभव आला, अशा शब्दांत ओमपुरी यांनी या घटनेवर टीका केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages