पालिकेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे स्कॅनिंग - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे स्कॅनिंग

Share This

मुंबई : अति महत्त्वाच्या कागदपत्रांचे जतन होणाच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाच्या सुमारे ८0 कोटी कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम डेटामिडिक आणि स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या दोन कंपन्यांना दिले आहे. यामुळे माहिती अधिकाराखाली मागविलेली कोणतीही माहिती तत्काळ उपलब्ध होणार असून ही माहिती शोधण्याचीही गरज उरणार नसल्याने वेळ वाचेल.

पालिके ला रेकॉर्ड जतन करण्यासाठी प्रत्येक महत्त्वाच्या पेपरचे स्कॅ निंग करावे लागणार असून एका पेपरसाठी ३६ पैसे खर्च आकारण्यात येणार आहे. तर ही कागदपत्रे जतन करण्यासाठी एका बॉक्सचा वापर केला जाणार असून त्याचे महिन्याचे भाडे ३२ रुपये असणार आहे. नवी मुंबई येथील महापे येथे या कंपनीच्या अधिकार्‍यांनी या सर्व कामांचे सादरीकरण दाखवित पत्रकारांना याबाबतची माहिती दिली. पालिकेकडे १८६९ पासूनची महत्त्वाची कागदपत्रे असून ही कागदपत्रे जतन करून ठेवणे महत्त्वाचे असल्याने सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

सर्व जुनी कागदपत्रे पालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार असल्याने कोणालाही ती पाहता येतील, असा पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न आयुक्तांचा आहे. या महत्त्वाच्या कागदपत्रांचे स्कॅनिंग व डिटिलायझेशन झाल्यामुळे माहितीच्या अधिकारात जी माहिती मागविली जाईल, तेव्हा संबंधित कागदपत्रांचा शोध घेण्यास जो विलंब होतो तो यामुळे वाचणार असून तत्काळ कोणतीही माहिती उपलब्ध होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages