पालिका शाळेतील रत्न डॉ. केळुसकरांनी शोधले - प्रभू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका शाळेतील रत्न डॉ. केळुसकरांनी शोधले - प्रभू

Share This

मुंबई : उपशिक्षणाधिकारी डॉ. जे. आर. केळुसकर यांच्या प्रोत्साहनामुळे सलोनी धुरी या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत इयत्ता सातवीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचा 'कवितेची वही' हा काव्यसंग्रह मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. त्या वेळी बोलताना मुंबई महानगरपालिका शाळेतील रत्न डॉ. जे. आर. केळुसकर यांनी शोधले, असे गौरवोद्गार महापौर सुनील प्रभू यांनी काढले.

उपशिक्षणाधिकारी डॉ. जे. आर. केळुसकर यांची कल्पकता दूरदृष्टी आणि संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाबद्दल मुंबईचे महापौर सुनील प्रभू, शिक्षण समिती अध्यक्ष मनोज कोटक आणि उपायुक्त शिक्षण सुनील धामणे यांनी गौरवोद्गार काढले. सलोनी ही मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरी मरोळ कॅम्प शाळेत इयत्ता सातवीत शिकते. अंधेरी पाइपलाइनसारख्या झोपडपट्टीच्या भागात ती राहते. 

कार्यक्रमाला शिक्षण समिती अध्यक्ष मनोज कोटक, उपायुक्त शिक्षण सुनील धामणे, शिक्षणाधिकारी रवींद्र भिसे, उपशिक्षणाधिकारी डॉ. जे. आर. केळुसकर, लेखिका आणि प्रशिक्षिका शरयू घाडी हे बृहन्मुंबई मनपाचे कार्यरत असलेले मान्यवर उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages