पालिकेच्या रुग्णालयांबाहेरील मेडिकलची दुकानदारी बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या रुग्णालयांबाहेरील मेडिकलची दुकानदारी बंद

Share This
मुंबई - पालिकेच्या रुग्णालयांबाहेर सुरू असलेली मेडिकलची दुकानदारी बंद करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्यासाठी रुग्णालयांतच सर्व औषधे उपलब्ध करून देण्याबरोबरच औषधांची यादी ठिकठिकाणी लावण्यात येणार आहे. 

सर्व पालिका रुग्णालयांत उपचारांसाठी लागणारी 1500 औषधे आणि 1500 उपकरणे यांच्या एकत्रित निविदा काढून खरेदी केली जाते. त्यासाठी पालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते; मात्र अनेक वेळा रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याचे सांगून रुग्णांना बाहेरून महागडी औषधे विकत घेण्यास सांगितले जाते. यावरून नगरसेवकांनी वेळोवेळी प्रशानसाला धारेवर धरले; मात्र भविष्यात अशी वेळ येणार नाही. कारण प्रत्येक रुग्णालयात शून्य औषधप्रणाली राबविण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सांगितले. 

पालिका रुग्णालयांत जेनेरिक औषधे रुग्णांना दिली जातात. काही वेळा औषधे उपलब्ध नसल्यास रुग्णालयांना गरजेच्या औषधांची खरेदी करण्याचे अधिकार दिले आहेत. याचा अवलंब दोन वर्षांपासून केला जात असून यापुढे अधिक सक्षमपणे त्याचा वापर केला जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी सांगितले. 

रुग्णालयातून दिल्या जाणाऱ्या औषधांची यादी जागोजागी लावण्यात येणार आहे. रुग्णालयांबरोबरच विभाग कार्यालयांमध्ये ही यादी लावण्यात येईल. त्यामुळे रुग्णांनाही या औषधांची माहिती सहज मिळेल, असे पालिकेच्या आरोग्य संचालिक डॉ. सुहासिनी नागदा यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages