बेस्टच्या चौक्‍या फेरीवाल्यांची गोदामे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टच्या चौक्‍या फेरीवाल्यांची गोदामे

Share This
मुंबई - कामाच्या ताणाने थकलेल्या बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी असलेल्या बेस्टच्या अनेक चौक्‍या सध्या फेरीवाल्यांची गोदामे झाली आहेत. या चौक्‍यांतील वीज आणि पाणी फेरीवाले राजरोस वापरीत आहेत. ही खळबळजनक माहिती उजेडात येताच त्यावर कारवाईचा निर्णय आज बेस्ट समितीच्या बैठकीत प्रशासनाने घेतला. 

बेस्टच्या चौक्‍या काही वर्षांपासून फेरीवाले वापरीत असल्याची गंभीर बाब आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य भास्कर खुरसुंगे यांनी बेस्ट समितीच्या निदर्शनास आणली. अनेक चौक्‍या फेरीवाल्यांची गोदामे झाली आहेत. एवढेच नव्हे, तर त्या चौक्‍यांचा वापर फेरीवाले जेवण बनविण्यासाठी करीत आहेत. बेस्टने कर्मचाऱ्यांसाठी "रेस्ट रूम' म्हणून तयार केलेल्या या चौक्‍यांचा अधिकारीच गैरवापर करीत आहेत. त्या बदल्यात फेरीवाल्यांकडून अधिकारी पैसे घेत असल्याची माहिती आज खुरसुंगे यांनी समितीच्या बैठकीत दिली. या चौक्‍यांची मालकी बेस्टकडे असताना या चौक्‍यांच्या चाव्या फेरीवाल्यांकडे आहेत. त्याचे पाणी आणि वीज ते राजरोस वापरीत आहेत, अशी माहितीही त्यांनी समितीच्या बैठकीत दिली. बसथांब्यांच्या; तसेच चौक्‍यांच्या परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे. तेथे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. अपघात झाल्यास बसचे चालक निलंबित होण्याची भीती आहे. त्यामुळे हा परिसर फेरीवालामुक्त करावा, अशी मागणीही खुरसुंगे यांनी केली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी घेतली. या प्रकरणी अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे गुप्ता यांनी या वेळी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages