'मुंबई ज्वालामुखीच्या उंबरठय़ावर' चे १0 मे रोजी प्रकाशन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'मुंबई ज्वालामुखीच्या उंबरठय़ावर' चे १0 मे रोजी प्रकाशन

Share This
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार लिखित 'मुंबई ज्वालामुखीच्या उंबरठय़ावर' या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार, १0 मे रोजी पोलीस क्लब, आझाद मैदान येथे सायंकाळी ४.३0 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या प्रकाशन सोहळय़ास गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संजय राऊत, मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह, नवृत्त न्यायमूर्ती रवींद्र दवे, मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त हिमांशु रॉय आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रभाकर पवार यांनी लिहिलेल्या मुंबईतील गुन्हेगारीचा एन्सायक्लोपेडिया या पुस्तकाच्या ४थ्या आवृत्तीचेही या वेळी प्रकाशन करण्यात येणार आहे. पोलीस डायरी, मुंबईतील रक्त गोठवणारी गुन्हेगारी, गँगवॉर ते बॉम्बस्फोट, मुंबई माफिया - एन्सायक्लोपेडिया ही गुन्हेगारीवर आधारित पवारांची पुस्तके यापूर्वी प्रकाशित झाली आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages