संजय दत्तला १५ मे रोजी जेलमध्ये जावे लागणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

संजय दत्तला १५ मे रोजी जेलमध्ये जावे लागणार

Share This

संजूबाबाचा तुरुंगवास अटळ!
सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळल्यामुळे आता अभिनेता संजय दत्तला १५ मे रोजी जेलमध्ये जावे लागणार आहे. १९९३ मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी संजूबाबाला सुप्रीम कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा ठोठावलेली आहे. दरम्यान, १५ मे रोजी शरण आल्यानंतर पुन्हा नव्याने पुनर्विचार याचिका केली जावू शकते, असे संजय दत्तचे वकील माजिद मेमन यांनी सांगितलंय.

मुंबईत शस्त्रबंदीचा कायदा लागू असताना घरात एके रायफली ठेवणा-या संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत शिक्षा केली आहे. संजयला २१ मार्च रोजी सुप्रीम कोर्टाने शिक्षा ठोठावली. मात्र काही सिनेमांचे शूटिंग सुरू असल्याचे कारण देत संजय दत्तने शरण येण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून १७ मे पर्यंतची मुदत मागितली होती. मात्र संजयने दिलेलेल कारण संयुक्तीक नसल्याचे मत नोंदवत न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली. त्यामुळे मुदत संपण्याआधीच १५ मे रोजी संजय शरण येणार आहे. आमच्यासमोर सध्या तरी अन्य कोणताही पर्याय नसल्याचे संजयच्या वकीलांनी सांगितले.

सुप्रीम कोर्टाने संजय व्यतिरिक्त आणखी सहाजणांची पुनर्विचार याचिकाही फेटाळली आहे. ज्यांची पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली आहे, त्या सगळ्यांनाच आता जेलमध्ये जावे लागेल. यात युसुफ मोहसिन नळवाला, खलिल अहमद सय्यद अली नाझीर, मोहम्मद दाऊद युसुफ खान, शेख असिफ युसुफ, मुझम्मिल उमर खद्री आणि मोहम्मद अहमद शेख यांचा समावेश आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages