देसाई रुग्णालयातील हंगामी कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी नोकरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 May 2013

देसाई रुग्णालयातील हंगामी कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी नोकरी


मुंबई : सांताक्रुझ येथील व्ही.एन.देसाई रुग्णालयात गेली तीन वर्ष विविध पदांवर हंगामी म्हणून काम करणार्‍या १७ कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी पालिकेत सामावून घेण्यात येणार आहे. मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत यासंबंधी मागणी केली होती. अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी त्यास मान्यता दिल्यामुळे कामगारांना लवकरच कायमस्वरूपी सेवेते सामावून घेण्यात येणार आहे.

व्ही.एन.देसाई रुग्णालयातील सीटी स्कॅन विभागातील १७ हगांमी पदे पुढे राखण्याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत आला होता. मनपाच्या नियमांनुसार तीन वर्षांनंतर हंगामी पदे कायमस्वरूपी करण्यात येतात. त्यानुसार या हंगामी कर्मचार्‍यांची तीन वर्ष पूर्ण झाल्याने त्यांना पालिकेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, अशी मागणी लांडे यांनी केली. तीन वर्ष हंगामी पदावर काम केल्यानंतरही कायमस्वरूपी पालिकेत सामावून न घेणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. या हंगामी कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी घ्या, त्यांना पोटभर द्या आणि मनभर घ्या असे, सांगत या हंगामी कर्मचार्‍यांना अन्याय न करता त्यांना न्याय द्या आणि रुग्णांची सेवा करून द्या, अशी मागणी लांडे यांनी केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त म्हैसकर यांनी लांडे यांची मागणी मान्य केली. त्यामुळे हंगामी पदावर काम करणार्‍या १७ कामगारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad