फेसबुक अवमान प्रकरणी पोलिसांना २४ तासांची डेडलाईन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

फेसबुक अवमान प्रकरणी पोलिसांना २४ तासांची डेडलाईन

Share This

मुंबई / अजेयकुमार जाधव 
फेसबुक वरून बाबासाहेब आंबेडकर तसेच भगवान बुद्ध यांचा संदीप अग्रवाल नामक व्यक्तीने अवमान केला असून बुधवारी (२९ मे) मुंबईच्या चेंबूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद होऊनही अद्याप कारवाही केली नसल्याने आज शुक्रवारी रमाबाई आंबेडकर नगर तसेच चेंबूर येथे निदर्शने करून बंद पाळण्यात आला.

घाटकोपर रमाबाई नगर येथे भारिप बहुजन महासंघ, आरपीआय आठवले गट, रिपब्लिकन सेना इत्यादी संघटना एकत्र एवुन बंद पाळला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पूर्व द्रुतगती महामार्गावर रास्तारोको केल्याने जवळच असलेल्या कामराज नगर, नालंदा या विभागातही कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी रमेश जाधव, किशोर कर्डक, जीवन भालेराव,कैलास बर्वे इत्यादी आंदोलनकर्त्यांनी पंतनगर पोलिस ठाण्यामध्ये निवेदन देवून संदीप अग्रवाल याला त्वरित अटक करण्याची मागणी केली. 

चेंबूर आरसीएफ येथे बुद्ध विहार ते चेंबूर नाका, आशिष थियेटर परिसरात आरपीआय आठवले गटाच्या वतीने निषेध करत निदर्शने करून दुकाने बंद करण्यात आली. यावेळी संदीप अग्रवाल नामक व्यक्तीला येत्या २४ तासात अटक न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा तसेच वेळ पडल्यास मुंबई बंद करण्याचा इशारा वैशाली जगताप, विष्णू गायकवाड, अनिस पठाण, महादेव साळवे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages