शास्त्रज्ञांनी त्वचेच्या पेशींपासून बनविले मानवी भ्रूण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शास्त्रज्ञांनी त्वचेच्या पेशींपासून बनविले मानवी भ्रूण

Share This
वॉशिंग्टन : मानवी क्लोनिंग तयार करण्याच्या दिशेने शास्त्रज्ञांना मोठे यश आले आहे. त्वचेच्या पेशींद्वारे त्यांनी सुरुवातीच्या काळातील मानव भ्रूण बनविले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मोठी उपलब्धी मानली जात असलेल्या या प्रयोगामुळे पर्किसन, मल्टीपल सिरोसिस, माकडहाडाचे दुखणे आणि हृदयासंबंधी रोगांमध्ये प्रत्यारोपनासाठी विशेष उती पेशींची निर्मिती करणे सोपे होणार आहे. अमेरिकेच्या ओरेगॉन नॅशनल प्राइमेट रिसर्च सेंटरच्या शास्त्रज्ञांनी हे महत्त्वाचे यश मिळविले आहे. १९९६ मध्ये डॉली नावाची पहिली क्लोन मेंढी तयार करण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता, तेच या वेळीही वापरण्यात आले. सुखरात मितालीपोव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या प्रयोगात शास्त्रज्ञांनी सोमॅण्टिक सेल न्यूक्लियर ट्रान्सफर तंत्रज्ञानाच्या मदतीने शरीराच्या पेशींना सुरुवातीच्या काळातील भ्रूणामध्ये परावर्तीत केले. त्वचेच्या पेशींपासून भ्रूण तयार करण्यात यश मिळाल्यानंतर शास्त्रज्ञ आता क्लोनिंगद्वारे मानवाची निर्मिती करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे गेले आहे. मितालीपोव यांच्या मते, आता अवयव प्रत्यारोपनाच्या शस्त्रक्रियेसाठी विशेष उतींची निर्मिती रुग्णाच्या त्वचेपासूनच करणे शक्य होईल. गंभीर रोगांच्या उपचारासाठी भ्रूणीय स्टेम म्हणजे स्कंध पेशी तयार करणे हा या संशोधनात हेतू होता. स्टेम पेशींवर वैद्यकीय क्षेत्राची नजर आहे. नव्या उती बनविण्यात यश आल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणारी हानी भरून काढली जाऊ शकते वा हानीग्रस्त माकडहाड दुरुस्त केले जाऊ शकते.
     

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages