पालिकेच्या लॉटरी पद्धतीमुळे पुरस्कारप्राप्त संस्थेवर काम बंद करण्याची वेळ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या लॉटरी पद्धतीमुळे पुरस्कारप्राप्त संस्थेवर काम बंद करण्याची वेळ

Share This

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने दत्तकवस्ती योजनेऐवजी वस्ती स्वच्छता प्रबोधन अभियानांतर्गत खाजगी संस्थांमार्फत स्वच्छता करण्याचे ठरवले आहे, मात्र या संस्थांची नेमणूक करताना लॉटरी पद्धत वापरण्यामुळे दहिसरमधील पालिकेचा स्वच्छता पुरस्कार मिळालेल्या संस्थेला लॉटरीत नंबर न लागल्याने आपली संस्था बंद करण्याची वेळ आली आहे.

आदर्श नागरिक सेवा संघ ही संस्था पालिकेच्या दत्तकवस्ती योजनेमध्ये २00१ पासून कार्यरत होती.पालिकेची दत्तकवस्ती योजना चालू होण्याआधी १९८८ पासून काजूपाडा, सावरपाडा विभागात याच स्वरुपाचे काम करण्यामध्ये ही संस्था अग्रेसर होती. सन २0१३ मध्ये मुंबई महानगरपालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी या संस्थेचे कार्य आणि काम करण्याची क्षमता आणि संस्थेचे पूर्वीचे रेकॉर्ड न पाहता स्वच्छता प्रबोधन अभियान योजनेसाठी लॉटरी पद्धतीने निवड केल्यामुळे पालिकेनेच गौरवलेल्या या संस्थेवर आपली संस्था बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. या संस्थेकडून नागरिकांना मदत म्हणून ५ हजारांपर्यंत वैद्यकीय मदत देण्यात येते. अशाप्रकारे वर्षाला १ लाख ५0 हजारांपर्यंत मदत केली आहे. या संस्थेमध्ये काम करणार्‍या स्वयंसेवकांपैकी ११ स्वयंसेवकांचा जीवन विमा १ लाख रुपयापर्यंत उतरवण्यात आला आहे. तसेच या संस्थेला मुंबई महानगरपालिकेतर्फे स्वच्छता पुरस्कारही देण्यात आला आहे. असे असताना केवळ लॉटरीमध्ये नंबर न लागल्याने एवढय़ा चांगल्या संस्थेला काम बंद करण्याची पाळी आली आहे. याबाबत पालिका आयुक्तांनी या योजनेबद्दल विचार करून मार्ग काढावा, अशी माफक अपेक्षा येथील नागरिकांकडून केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages