सोलापूरच्या पाण्यासाठी भय्या देशमुखांचे आसुड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सोलापूरच्या पाण्यासाठी भय्या देशमुखांचे आसुड

Share This

मुंबई : उजनी धरणाच्या पाण्यासाठी गेल्या ९४ दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करूनही शासनाकडून दखल न घेतल्याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी गुरुवारी आपले आंदोलन आणखी तीव्र केले. देशमुख यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्यासमोर पोतराजाचे रूप धारण करत चाबकाचा आसूड ओढत आंदोलन करण्याचा पण केला होता. मात्र याबाबतची कुणकुण लागताच आझाद मैदान पोलिसांनी देशमुख आणि कार्यकर्त्यांना अटक केली.

उजनी धरणाचे पाणी उजव्या-डाव्या कालव्यात व आष्टी तलावात सोडण्यात यावे, या मागणीसाठी देशमुख गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलनाला बसले आहेत. मात्र शासनाकडून त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. या कारणावरून दिवसेंदिवस देशमुख यांचे आंदोलन तीव्र होत आहे. देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह गुरुवारी सकाळी पोतराजचा वेष परिधान करून स्वत:च्या पाठीवर चाबकाचे फटके मारले. आझाद मैदान ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत चाबकाचे फटके मारण्याचे देशमुख आणि कार्यकर्त्यांनी ठरवले होते. त्याच्याअगोदरच आझाद मैदान पोलिसांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन देत देशमुख आणि कार्यकर्त्यांना अटक केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages