पालिकेच्या ३१४ फायली गायब / ‘व्हिजिलन्स’ चौकशी करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या ३१४ फायली गायब / ‘व्हिजिलन्स’ चौकशी करणार

Share This
मुंबई  - इमारत प्रस्ताव विभागाच्या वांद्रे येथील कार्यालयातून ३१४ फायली गहाळ झाल्या. याचे पडसाद स्थायी समिती बैठकीत उमटले. अशाप्रकारे फायली गहाळ होण्यामागे नेमके काय कारण आहे, असा संशय स्थायी समिती सदस्यांनी व्यक्त केला असता ही गंभीर बाब असून याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांची चौकशी पालिकेच्या व्हिजिलन्स विभागाकडून करण्यात यावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिले.

इमारत प्रस्ताव विभागातून फायली गायब होत असल्याबाबत रईस शेख यांनी हरकतीचा मुद्दा घेतला. याला समर्थन देताना सभागृहनेते यशोधर फणसे यांनी विविध खात्यांमधून फायली गायब होत असताना प्रशासन मात्र ढिम्म बसले असल्याची टीका केली. मनोज कोटक यांनी शिक्षण विभागातूनही कागदपत्रे, फायली गहाळ होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणली. दिलीप लांडे यांनी ठराविक विकासकांच्याच फायली गायब होत असल्याचे सांगितले. याची दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांची व्हिजिलन्सद्वारे चौकशी करण्याचे निर्देश दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages