दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Share This
मुंबई : पहिल्याच पावसात सखल भागात बसवलेले पंप बंद राहण्यास आणि अकार्यक्षम असण्यास कारणीभूत असलेल्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी पालिका सभागृहनेते यशोधर फणसे यांनी केली आहे. पावसाळ्यात उद्भवलेल्या समस्या व कोलमडलेल्या यंत्रणेबाबत विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी एका निवेदनाद्वारे हा प्रश्न उपस्थित केला. त्या वेळी झालेल्या चर्चेत फणसे यांनी ही मागणी केली.

मुंबई महापालिकेने शहर व उपनगरातील १८0 सखल भागात साचणारे पावसाचे पाणी निचरा करण्यासाठी २२0 पंप भाडेतत्त्वावर बसवले. त्या वेळी पालिकेने १0 कोटी खर्च करण्याचा निर्णय घेतला. पालिकेने मुंबईकरांना पावसाळ्यात दिलासा देण्यासाठी बसवलेले पंप बंद पडले. अकार्यक्षम ठरले तर मग अशा पंपांचा उपयोग काय, शिवाय पालिकेने या पंपावर कोट्यवधी रुपये का खर्चावेत, असा सवाल करून यशोधर फणसे यांनी संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages