आठवले यांनी दिली महायुतीत मतभेद असल्याची स्पष्ट कबुली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आठवले यांनी दिली महायुतीत मतभेद असल्याची स्पष्ट कबुली

Share This
मुंबई – शिवसेना आणि भाजपसोबत असलेल्या आमच्या महायुतीत मतभेद असल्याची स्पष्ट कबुली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली आहे. शिवसेना आणि भाजपचे हिंदुत्व आम्हाला मान्य नसून, आरक्षणाच्या मुद्दय़ावरूनही मतभेद आहेत. मात्र, राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आम्ही मतभेदांसह महायुती केली असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयातील पत्रकार कक्षात बुधवारी त्यांनी महायुती आणि मनसेबाबत रिपाइंची भूमिका स्पष्ट केली. हिंदुत्वाला असलेला विरोध कायम ठेवून आम्ही महायुतीत सहभागी झालो आहोत. महागाई, भ्रष्टाचार, दलितांवरील अन्याय अशा मुद्दय़ांवर आघाडी सरकार खाली खेचण्यासाठी आमची लढाई सुरूच राहणार आहे. म्हणूनच महायुतीतील एक घटक पक्ष म्हणून रिपाइंला बळ देण्याची जबाबदारी या दोन्ही पक्षांची आहे. केवळ शिवसेनाच नाही, तर भाजपानेही ही जबाबदारी समजून घेत पार पाडली पाहिजे. लवकरच तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे. त्यात जागावाटपाचा निर्णय होईल अशी, अशा आठवले यांनी या वेळी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages