मुंबईकरांना वाऱ्यावर सोडत महापौर, गटनेते शांघायच्या दौर्‍यावर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईकरांना वाऱ्यावर सोडत महापौर, गटनेते शांघायच्या दौर्‍यावर

Share This

मुंबई : पावसाळ्यापूर्वी मुंबई मनपाने नालेसफाई, रस्त्याची कामे हाती घेतली असतानाच मान्सून पूर्व पावसाने मुंबईत हजेरी लावली आहे. त्यातच रस्ते, नालेसफाईची अर्धवट कामे, पावसाळ्यात उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती याकडे कानाडोळा करत महापौरांसह स्थायी समितीच्या सदस्यांनी शांघायचा दौरा आयोजित केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

शांघाय येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित पाणी परिषदेला उपस्थित राहण्याकरिता महापौर सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, सभागृह नेता यशोधर फणसे, भाजपा गटनेते दिलीप पटेल, विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते धनंजय पिसाळ, शिक्षण समिती अध्यक्ष मनोज कोटक यांच्यासह स्थायी समितीचे काही सदस्य चीनच्या दौर्‍यावर निघाले आहेत. मंगळवारी मध्यरात्री निघायचा या सर्वांचा विचार आहे. मात्र मुंबईत आतापासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. या वर्षी लवकर पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर पावसाळ्यात उद्भवणार्‍या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पालिकेतर्फे जोरदार तयारी सुरू आहे, तर नालेसफाई व रस्त्यांची कामेही अर्धवट अवस्थेत आहेत. मुंबईत पावसाने जोर धरल्यास या कामांना खीळ बसण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत स्थायी समितीतील सदस्य शांघायाच्या दौर्‍यावर निघाल्याने पालिका वतरुळात याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages