छायाचित्रांतून उलगडला भारतीय रेल्वेचा इतिहास - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

छायाचित्रांतून उलगडला भारतीय रेल्वेचा इतिहास

Share This
मुंबई : चोवीस तास देशाच्या कानोकोपर्‍यात धडधडत राहणार्‍या रेल्वेने १६0 वर्ष पूर्ण केली आहेत.कोळशावर चालणारी रेल्वे ते सध्याची अत्याधुनिक इंजिनवर धावणार्‍या रेल्वेचा इतिहास उलगडणार्‍या छायाचित्र प्रदर्शनाचे एनसीपीएत आयोजन करण्यात आले आहे. मुंबईकरांना १६ जूनपर्यंत मोफत असलेले प्रदर्शन पाहण्याची संधी मिळणार आहे.

बोरिबंदर (सीएसटी) ते ठाणे या ३४ किमीच्या मार्गावर १६ एप्रिल १८५३ रोजी पहिली ट्रेन धावली होती. वाफेवर चालणारे धावणारे इंजिन, गॉथिक शैलीत उभारण्यात आलेले व्हिक्टोरिया टर्मिनस असा इतिहास या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबईकरांना पाहण्यास मिळणार आहे. नॅरोगेजवरील मालगाड्या, हत्तीच्या सहाय्याने कारशेडमध्ये नेण्यात येणारे डब्बे, जुन्या रेल्वे गाड्या आणि इंजिन प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. रेल्वेप्रमाणेच तत्कालीन नेते मंडळीचा प्रवासही यानिमित्ताने पाहण्याची संधी प्राप्त झाली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा प्रवास, गुरूनाथ रवींद्र टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस, तत्कालीन रेल्वे मंत्री लालबहादूर शास्त्री, लाहोर येथील रेल्वे पोलीस ठाण्यात कैद करण्यात आलेले हुतात्मा क्रांतिकारक भगतसिंग आणि असंख्य दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages