आयुक्तांनी हवामान खात्यावर ढकलली जबाबदारी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आयुक्तांनी हवामान खात्यावर ढकलली जबाबदारी

Share This
मुंबई : पावसाचे मुंबईत आगमन कधी होणार याबाबतची सूचना हवामान खात्याकडून मिळते. पाऊस सुरू झाल्यावर हवामान खात्याकडून संदेश आला. त्यानुसार सर्व व्यवस्था करण्यात आली होती, मात्र हवामान विभागाचा अंदाज खोटा ठरला आणि पाऊस पडलाच नाही. हवामान खात्यानुसार पालिका तयारी करते, असे स्पष्ट करत आयुक्त सीताराम कुंटे यांनी प्रशासनावर झालेल्या आरोपाचा खुलास केला. या कृतीमुळे एकप्रकारे पाणी साचून मुंबईचे जनजीवन विस्कळीत होण्याच्या प्रकारातून आयुक्तांनी सर्वप्रकारची जबाबदारी हवामान खात्यावर ढकलली आहे. 

सभागृहात नगरसेवकांनी मांडलेल्या सर्व मुद्दय़ांची आम्ही नोंद घेतली आहे. त्यावर सविस्तरपणे लेखी स्पष्टीकरण दिले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहता पावसात काहीही होणार नाही, असा दावा करणे कठीण आहे. पावसाळी आढावा बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सर्व परिस्थिती विषद केले होती. ६५ मिमीच्या वर पाऊस पडल्यास आणि त्याचवेळी साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा असतील तर पाणी साचणारच, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांना दिलासा मिळेल. त्याचप्रमाणे या अंतर्गत उभारण्यात येणार्‍या पम्पिंग स्टेशनची कामे जलदगतीने करण्याच्या सूचना दिल्याचे आयुक्तांनी या वेळी सांगितले. आयुक्तांच्या स्पष्टीकरणावर समाधान न झाल्यामुळे अखेर विरोधकांनी सभात्याग करत प्रशासनाचा निषेध केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages