१ जुलैपासून पालिकेचे ‘ऑपरेशन आयव्हीएफ’ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

१ जुलैपासून पालिकेचे ‘ऑपरेशन आयव्हीएफ’

Share This
- प्रत्येक आयव्हीएफ सेंटरची कडक तपासणी करणार
- शाहरूखसह आमीर, फराह खानच्या सरोगसीच्या नोंदींबाबतही शंका
मुंबई - अभिनेता शाहरूख खान सरोगसी प्रकरणातून धडा घेत मुंबई महानगरपालिका १ जुलैपासून ‘ऑपरेशन आयव्हीएफ’ हाती घेणार आहे. अद्ययावत तंत्राने गर्भधारणा करणार्‍या आयव्हीएफ सेंटर्सची कडक तपासणी केली जाणार आहे. सरोगसीद्वारे गर्भधारणा केल्याच्या नोंदी ही सेंटर्स ठेवतात की नाहीत याची कसून चौकशी केली जाणार आहे. 

शाहरूखला सरोगसी मातेद्वारे तिसरे अपत्य होणार आहे आणि त्याने त्याची गर्भलिंग चाचणीही केली अशा वृत्तानंतर ‘लेक लाडकी अभियान’च्या ऍड. वर्षा देशपांडे यांनी महानगरपालिकेकडे तक्रार केली होती. पालिका अधिकार्‍यांचे पथक शाहरूखच्या बंगल्यावर चौकशीसाठीही गेले होते. शाहरूख मुंबईत नसल्याने त्याने इ-मेलद्वारे संवाद साधला असे अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी सांगितले. शाहरूखने सरोगसी किंवा गर्भलिंग चाचणी परदेशात केली असेल तर पालिका काहीच करू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सीआयडी चौकशी कराऍड. देशपांडे यांनी आज मनीषा म्हैसकर यांची भेट घेतली. पालिकेकडे वैद्यकीय आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम अधिकारी नसल्याने शाहरूख प्रकरणाचा तपास संथगतीने झाला. अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी माहिती तंत्रज्ञान, कायदा क्षेत्रातील तज्ज्ञ हवेत. सीआयडीच्या माध्यमातूनही तपास होऊ शकतो, असे ऍड. देशपांडे यांनी सांगितले. 

जसलोककडे १० वर्षांच्या नोंदीच नाहीत!सरोगसी आणि आयव्हीएफची आधुनिक यंत्रणा जसलोकमध्ये आहे. परंतु त्याचा किती आणि कोणी लाभ घेतला याच्या गेल्या दहा वर्षांच्या नोंदीच जसलोककडे नाहीत, असा दावा ऍड. देशपांडे यांनी केला. यापूर्वी आमीर आणि फराह खान यांना सरोगसी तंत्राने झालेल्या अपत्यांबाबतच्या नोंदी आहेत का? आयव्हीएफ सेंटर्सकडून जी, डी आणि ई फॉर्म भरले जातात का? तसेच दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत सेंटर्सकडून माहिती दिली जाते का याचीही चौकशी करण्याची मागणी ऍड. देशपांडे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages