मुंबईतील शाळा कात टाकणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईतील शाळा कात टाकणार

Share This
मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या वास्तू अतिशय जुन्या तसेच मोडकळीस आल्यासारख्या दिसतात, अशी तक्रार अनेकदा पालकांची असते. आर्थिक पाठबळ असलेल्या चकाचक शाळांच्या तुलनेत या शाळांना अतिशय नगण्य असेच स्थान असते; परंतु या शाळांची दुरुस्ती आणि दजर्ाेन्नतीचे काम आता पालिकेने हाती घेतले आहे. त्यानुसार पालिका शाळा आता कात टाकणार आहेत. त्यामुळे या पालिका शाळांतील मुलांनाही आपल्या शाळांचे नाव अभिमानाने घेता येणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धनुका समितीने सुचवल्याप्रमाणे पालिका शाळांची दुरुस्ती आणि दजर्ाेन्नतीचे काम येत्या तीन ते चार वर्षांमध्ये पूर्ण होईल, अशी माहिती अनिल कांबळे उपअभियंता यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेच्या मुंबईत एकूण ४५३ शाळा असून पालिका शाळांच्या निकृष्ट पायाभूत सुविधा आणि सोयींच्या अभावाबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेनुसार न्यायालयाकडून पालिका शाळांची पाहणी करण्यासाठी समिती नेमली होती. या धनुका समितीच्या शिफारसीनुसार १७३ शाळा इमारत दुरुस्ती आणि दजर्ाेन्नतीसाठी निश्‍चित केल्या गेल्या. यानुसार आतापर्यंत धनुका समितीने निश्‍चित केलेल्या शाळांपैकी ९४ शाळांचे काम पूर्ण झाले असून इतर शाळांच्या दुरुस्तीचे काम येत्या तीन ते चार वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. या कामासाठी सन २0११-१२ च्या अर्थसंकल्पात २९९ कोटींची तरतूद केली होती. त्यातील १२0 कोटी रुपये खर्च झाले होते. सन २0१३-१४ च्या अर्थसंकल्पात २५७.३ कोटींची तरतूद केली होती. त्यातील १६३.५0 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, तर आता सन २0१३-१४ अर्थसंकल्पात २७३.२५ कोटी रुपयांची तरतूद केली असून एप्रिल २0१३ पर्यंत ४.८ कोटी खर्च झाले असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

सात नवीन शाळा बांधणार
मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईत सात नवीन शाळा बांधल्या जाणार असून या सर्व शाळांचे बांधकाम येत्या दोन वर्षांमध्ये पूर्ण केले जाईल, अशी माहिती अनिल कांबळे, उपअभियंता स्वतंत्र पायाभूत सुविधा कक्ष यांनी शुक्रवारी सादरीकरणादरम्यान पत्रकारांशी बोलताना दिली.मुंबईत पालिकेच्या ४५३ शाळा असून यात सात शाळांची भर पडणार आहे. या सात शाळांसाठी पालिकेच्या सन २0१२-१३ च्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या २७३-२५ कोटी रुपयांमधून खर्च केला जाणार असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले. कुरार गाव, इराणी वाडी, अजिज बाग, शताब्दी हॉस्पिटलजवळ, विलेपार्ले (पूर्व), वामनराव महाडिक शाळेच्या बाजूला-माटुंगा, प्रतीक्षा नगर (सायन).

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages