प्रीतीच्या उपचाराचा बावीस लाख रुपये खर्च पश्‍चिम रेल्वे भरणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रीतीच्या उपचाराचा बावीस लाख रुपये खर्च पश्‍चिम रेल्वे भरणार

Share This

मुंबई - वांद्रे टर्मिनसवर एका माथेफिरूच्या ऍसिड हल्ल्यात जखमी झालेली नवी दिल्लीची प्रीती राठी या तरुणीने शनिवारी अखेरचा श्‍वास घेतला. गेल्या महिनाभरापासून तिची सुरू असलेली मृत्यूची झुंज संपली. रुग्णालयात सुरू असलेल्या तिच्यावरील उपचाराचा खर्च तब्बल बावीस लाख इतका झाला आहे. रुग्णालयांचा हा सर्व खर्चाचा भार पश्‍चिम रेल्वे उचलणार आहे. 

वांद्रे टर्मिनसवर २ मे रोजी दिल्लीहून आलेल्या प्रीतीवर एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने ऍसिड हल्ला केला. तिला तातडीने वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु गंभीर जखमी झालेल्या प्रीतीला भायखळा येथील मसीना रुग्णालयात भरती करण्यात आले. तीन आठवड्यांच्या उपचारानंतर र्ंिप्रीतीला मुंबई रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तिच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. परंतु मुंबई रुग्णालयातच प्रीतीने अखेरचा श्‍वास घेतला. मात्र, प्रीतीवर झालेल्या उपचाराचे मसीना रुग्णालयाने ४.३९ लाख रुपये तर मुंबई रुग्णालयाने १७.५० लाख रुपये खर्चांचे बिल पश्‍चिम रेल्वे प्रशासनाला पाठविले आहे. अजूनही मुंबई रुग्णालयाचे अंतिम बिल येणे बाकी आहे. यापैकी प्रशासनाने मसीना रुग्णालयाला २.८९ लाख रुपये चुकते केले आहेत. दोन्ही रुग्णालयांची उर्वरित रक्कम लवकरात लवकरत देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages