मुंबई : मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळून नवृत्ती घेतलेले आणि बेस्टच्या महाव्यवस्थापकपदाची जबाबदारी सांभाळलेले आयएसआय अधिकारी यांनी आता कामगार युनियन क्षेत्रात पाऊल टाकले असून पालिकेत मुंबई महानगरपालिका एससी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी, जेबीसी एम्प्लॉईज असोसिएशन नावाने संघटना स्थापन करण्यात आली आहे.
माजी सनदी अधिकार्यांकडून नवृत्तीनंतर कामगार युनियन क्षेत्रात काम करण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. या संघटनेचे अध्यक्षपद माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे, तर कार्याध्यक्ष माजी अतिरिक्त आयुक्त किशोर गजभिये हे सांभाळणार आहेत. या संघटनेचे सरचिटणीस संजय कांबळे-बापरेकर हे काम पाहाणार आहेत. खोब्रागडे यांनी नवृत्ती घेतल्यानंतर खासदार रामविलास पासवान यांच्या राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टीत गेल्यावर्षी प्रवेश केला होता. किशोर गजभिये हे २00७ मध्ये पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. हे दोन्ही माजी सनदी अधिकारी युनियनचे पदाधिकारी म्हणून गेल्या ४ जुलै रोजी पालिका आयुक्त कुंटे यांची सदिच्छा भेट घेवून नंतर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

No comments:
Post a Comment