बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीवरील वर्चस्वासंदर्भात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर व आनंदराज आंबेडकर या नेत्यांसह संस्थेच्या विश्वस्तांना सोसायटी संचालित सर्व संस्थांमध्ये पोलिसांनी प्रवेशबंदी केली आहे.
रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), भारिप-बहुजन महासंघ आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘पीपल्स’वरील वर्चस्वावरून वाद आहे. या संस्थेच्या विश्वस्तपदांविषयीचा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. धर्मादाय आयुक्तांकडेदेखील तक्रारी दाखल आहेत.
गेल्या महिन्यात रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी सिद्धार्थ महाविद्यालयात घुसून संस्थेचा ताबा घेतला होता. आंबेडकर यांच्या या कृतीच्या विरोधात आठवले यांनी त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. या प्रकारामुळे सिद्धार्थ महाविद्यालय परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तसेच, सोसायटीच्या वर्चस्वावरून या नेत्यांच्या अनुयायांमध्ये संघर्ष उडून कायदा-सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी पोलिसांना सज्ज राहावे लागत आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 15 जुलै रोजी होत आहे.
No comments:
Post a Comment