महाबोधी विहार बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ पालिका सभा तहकूब - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाबोधी विहार बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ पालिका सभा तहकूब

Share This
मुंबई : मुंबई महानगरपालिकेची जुलै महिन्यातील सोमवारची पहिलीच सभा बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी विहार आणि परिसरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या निषेधार्थ कोणतेही कामकाज न करता 

तहकूब करण्यात आली.सभा सुरू होण्यापूर्वी महापौर सुनील प्रभू यांनी या घटनेबाबत निवेदन करताना सांगितले की, जागतिक पातळीवरील बौद्धधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले आणि दया, क्षमा, शांती व अहिंसा या तत्त्वांचे मूळस्थान असलेले बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी मंदिर परिसरात दहशतवाद्यांनी भीषण हल्ला चढवला. या परिसरात एकामागोमाग नऊ स्फोट करण्यात आले. बुद्धगया परिसरातील हा हल्ला म्हणजे कौर्याचा कळसच आहे. त्यामुळे केवळ दहशतवादाचा विरोध करून तो संपणार नाही, तर तो मुळापासून उपटून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून भावी पिढय़ांना दहशतवाद्यासारख्या आपत्तीला तोंड द्यावे लागणार नाही. यासाठी केंद्र सरकार प्राधान्याने लक्ष पुरवेल, अशी खात्री असल्याचे महापौरांनी सांगितले. या भ्याड हल्ल्यात एका विदेशी नागरिकाला आपले प्राण गमवावे लागले, तर एक बौद्ध भिक्खू जखमी झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages