गहाळ फाईल प्रकरणात एफआयआर दाखल करा - शेवाळे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गहाळ फाईल प्रकरणात एफआयआर दाखल करा - शेवाळे

Share This
मुंबई : महापालिकेच्या विविध विभागांतील आणि विशेषकरून इमारत प्रस्ताव विभागाच्या फाइल्स गहाळ प्रकरणाचे बुधवारी पालिकेत तीव्र पडसाद उमटले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी प्रशासनाला केली आहे.

आतापर्यंत विविध विभागांतील जवळपास ९ हजार फाइल्स गहाळ झाल्या आहेत. स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या मुद्दय़ावर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला. गहाळ झालेल्या २३0 फाइल्स प्राप्त करण्यात आल्या आहेत. गहाळ झालेल्या फाईल चुकून अन्य विभागात गेल्या असतील, असे उत्तर या वेळी प्रमुख अभियंत्यांनी दिले. मात्र या उत्तरावर सदस्यांचे समाधान झाले नाही. कुर्ला येथील शीतल तलावात टाकून दिलेल्या फाइल्स आपल्याकडे असल्याचा दावा या वेळी मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी केला. माजी आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीने फाईल मंजूर केल्याचे उघडकीस आले असतानाही याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. आयुक्त सीताराम कुंटे यांच्या दालनातून फाइल्स गहाळ कशा होतात, असा सवाल या वेळी सपाचे गटनेते रईस शेख यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या सदस्य किशोरी पेडणेकर यांनी आपल्या विभागातील पालिका कार्यालयातून १0५ फाइल्सची चोरी करताना रंगेहाथ पकडल्याचे या वेळी सांगितले. मात्र यावर अद्यापही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages