समुद्रकिनार्‍यांवर जीवरक्षक नेमण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

समुद्रकिनार्‍यांवर जीवरक्षक नेमण्याची मागणी

Share This
तीन मुलांचे मृतदेह सापडले
मुंबई : मार्वे बीचवर रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या आठ मुलांपैकी तीन मुले बुडाली होती. या तीन मुलांचे मृतदेह सोमवारी मार्वेच्या समुद्रकिनार्‍यावर आढळले. या मुलांचा शोध रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होता. जितेश दत्ताराम पास्ते (१५), मयुर ज्ञानेश गायकवाड (१२) आणि शिवा अशोक गुप्ता (१३) अशी या तीन मुलांची नावे असून, ही सर्व मुले मालाड पूर्वेकडील रेल्वे रुळालगत राहणारी आहेत. ही मुले रविवारी

दुपारी मार्वे बीचवर पोहण्यासाठी गेली होती. त्यापैकी पाचजण परतले, मात्र तीनजण बेपत्ता झाले.?मुंबई : रविवारी मार्वे येथील समुद्रात तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. या ठिकाणी जीवरक्षक नसल्याने ही बालके बुडाली, हे लक्षात घेता मुंबईतील समुद्रकिनार्‍यांवर तातडीने जीवरक्षक नेमावेत, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक विनोद शेलार यांनी पालका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. मुंबईतील समुद्रकिनारे पालिकेच्या अखत्यारित येत असल्याने समुद्रकिनारे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पालिकेची असल्याचे शेलार यांनी पत्रात नमूद केले आहे.

मनपाच्या अधिकार क्षेत्रात मुंबईतील समुद्रकिनारे येतात. त्यांची निगा राखणे तसेच तेथे जीवरक्षक व्यवस्था पुरवणे हे पालिकेचे कर्तव्य असताना अनेक समुद्रकिनार्‍यांवर लाइफ गार्ड नसल्याने बुडून मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. समुद्रामध्ये भरती-ओहोटीमुळे मुख्यत: पावसाळ्यात समुद्रकिनारे धोकादायक बनतात. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डमार्फ त भरती-ओहोटीचे सूचनाफलक लावण्यात आलेले नसल्याने पाण्यात उतरणार्‍यांना भरती-ओहोटीची कल्पना नसते. त्यामुळे सर्व समुद्रकिनार्‍यांवर भरती-ओहोटीचे फलक लावावेत तसेच पालिकेकडून जीवरक्षक नेण्यात यावेत, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. पालिका प्रशासनाकडून या ठिकाणी जेट्टी असल्याने जीवरक्षक नेमण्यात आले नसल्याचा खुलासा केला असला तरी हा भाग समुद्रकिनाराच असल्याने येथे जीवरक्षक नेमणे अत्यंत आवश्यक असून तशी मागणी आपण अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांच्याकडे केली आहे, असे शेलार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages