फेरनिविदा काढण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आश्‍वासन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

फेरनिविदा काढण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आश्‍वासन

Share This
पालिका मार्केटमधील गाळे वाटप
मुंबई : मनपाच्या बाजार विभागातर्फे मंडयांमधील गाळे वाटपासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत मराठी तरुणांना डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचे आढळून आला आहे. त्यामुळे या प्रकरणात फेरनिविदा काढण्यात येईल, असे आश्‍वासन अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी दिले आहे.

पालिकेच्या ११ मार्केटमधील रिकामे गाळे वितरणाबाबत निवडक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली होती. या अनुषंगाने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी संबंधित विभागाच्या अधिकार्‍याने अर्धा तास आधीच अर्ज स्वीकारणे बंद केले. याबाबत गुरुवारी पालिकेत तीव्र पडसाद उमटले. भाजपा नगरसेवक, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष महेश पारकर यांनी या मुद्दय़ाला वाचा फोडली. या निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढण्याची मागणी या वेळी पारकर यांनी केली. भाजपाच्या नगरसेविका राजश्री शिरवळकर यांनी या वेळी गाळेवाटप प्रक्रियेत महिलांना ५0 टक्के संधी देण्याची आणि मनसेचे प्रकाश दरेकर यांनी गाळे वाटपाचे अर्ज मराठीत छापण्याची मागणी केली. गाळेवाटपासंबंधीची जाहिरात निवडक वृत्तपत्रांत प्रसिद्ध केल्यामुळे तरुणांपर्यंत याबाबतची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे फेरनिविदा काढून अधिकाधिक वृत्तपत्रांत प्रसिद्धी द्यावी, अशी मागणी सभागृह नेते यशोधर फणसे यांनी केली. सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेता महापौर सुनील प्रभू यांनी फेरनिविदा काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages