मुंबई – यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या एम.बी.ए. शिक्षणक्रमाची प्रवेश परीक्षा रविवार दिनांक ४ ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत आयोजित करण्यात आली असून, त्यासाठीचे प्रेवेश अर्ज अभ्यासकेंद्रांवर जमा करण्याची आज (३ ऑगस्ट २०१३) अंतिम मुदत आहे.
विद्यार्थ्यांना मार्केटिंग, फायनान्स, एच.आर. आणि मॅन्युफॅक्चरिंग या विषयात विशेषीकरणासह पदवी ग्रहण करण्याची संधी विद्यापीठाने उपलब्ध करुन दिली आहे. मुंबईतील विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पी.डी.हिंदुजा महाविद्यालय, चर्नी रोड, शेठ आनंदीलाल पोद्दार महाविद्यालय, सांताक्रूझ, आर.डी.नॅशनल महाविद्यालय, बांद्रा, चेतना महाविद्यालय, बांद्रा, विकास हायस्कूल, विक्रोळी, रत्नम महाविद्यालय, भांडूप, या अभ्यासकेंद्रांवर संपर्क साधावा.
हा शिक्षणक्रम २ वर्षाचा असून, पदवी शिक्षण ४५ % सह उत्तीर्ण विद्यार्थी (मागासवर्गीय विद्यार्थी ४० %) प्रवेश परीक्षेस पात्र ठरतील. व्यवसाय किंवा नोकरी करुन पदोन्नतीसाठी आणि आपला शैक्षिणक दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी या शिक्षणक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय संचालक डॉ.प्रकाश देशमुख यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी २३८७४१८६ किंवा २३८७४१८७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

No comments:
Post a Comment