| मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मृतिदिनीच राजकारणापासून दूर राहिलेले त्यांचे चिरंजीव जयदेव ठाकरे यांनी राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले आहेत. येत्या काही दिवसात आपण एका संघटनेची स्थापना करणार असून ती केवळ मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी असेल, असेही जयदेव यांनी म्हटले आहे. आतापर्यंत नेहमी राजकारणापासून अलिप्त राहिलेले जयदेव ठाकरे यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपणही लवकरच राजकारण येणार असल्याचे म्हटले. ते या वेळी म्हणाले की, हजारो शिवसैनिकांनी पक्षासाठी खस्ता खाल्या. रक्त आटवले, पण त्यांच्या पदरी निराशेशिवाय काही पडले नाही. अशा नाराज पण कडवट शिवसैनिकांच्या मदतीने, त्यांच्यासाठी आपण लवकरच एक स्वतंत्र संघटना काढणार असल्याचे जाहीर करून जयदेव यांनी आपल्या राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले आहेत. तसेच बाळासाहेबांच्या स्मारकाविषयी त्यांना विचारले असता त्यांनी शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय कोणाचाही पुतळा नको, अशी परखड भूमिका मांडली. मुंबईतील मोकळ्या जागा अगोदरच बिल्डरांनी घशात घातल्या आहेत. शिवतीर्थावर बाळासाहेबांचे स्मारक उभारल्यास आणखी एका मैदानाचा बळी जाईल. खेळाचे मैदान अडवणे स्वत: बाळासाहेबांनाही मान्य नव्हते. शिवाजी पार्कवर छोटेसे स्मृतिस्थळ उभारणे वेगळे आणि स्मारक वेगळे. शिवाजी पार्क हे मैदानच राहिले पाहिजे. महापौर निवासाजवळच्या मोकळ्या जागेत बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा विचार करायला आपला विरोध नाही. तसेच शिवसेना नेत्यांनी स्वखर्चाने बाळासाहेबांचे इतरत्र स्मारक उभारावे, असेही ते या वेळी म्हणाले. दरम्यान, उद्धव आणि राज यांना एकत्र आणण्याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे दोन स्वतंत्र पक्ष चालवत आहेत. त्यांना वाटले तर ते एकत्र येतील. मी त्यांच्यात मध्यस्थी करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. |
Post Top Ad
18 November 2013
Home
Unlabelled
लवकरच राजकारणात येणार - जयदेव ठाकरे
लवकरच राजकारणात येणार - जयदेव ठाकरे
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment