महिला धोरणाबाबत वर्षा गायकवाड यांची आँस्ट्रेलियन मंत्र्यांशी चर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महिला धोरणाबाबत वर्षा गायकवाड यांची आँस्ट्रेलियन मंत्र्यांशी चर्चा

Share This
मुंबई – आँस्ट्रेलिया व भारत या देशांतील महिलांच्या प्रश्नाबाबत आँस्ट्रेलियाच्या महिला कल्याण विभागाच्या मंत्री हेदी व्हिक्टोरिया यांच्याशी महिला व बालविकासमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज सह्याद्री अतिथी गृह येथे चर्चा केली.

या चर्चेदरम्यान नव्या महिला धोरणाविषयी मा. वर्षा गायकवाड यांनी आँस्ट्रेलियन मंत्र्यांना महिला धोरणाविषयी माहिती दिली व एक धोरणाची प्रत दिली. दोन्ही देशातील महिलांचे विविध प्रश्न, वेशांच्या समस्या व तृतीयपंथी, त्यांचे अधिकार या सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली. भारतीय राजकारणात महिलांचा सहभाग कमी आहे, उलटपक्षी आँस्ट्रेलियामध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे यावेळी हेदी व्हिक्टोरिया यांनी सांगितले. त्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी मा. वर्षा गायकवाड यांनी महिलांच्या हक्कात सुधारणा झाल्याचे तसेच नवनवीन कायद्यांची माहिती दिली. यावेळी हैदी व्हिक्टोरिया यांनी मा. वर्षा गायकवाड यांच्या कामाचे कौतुक केले व त्यांना आँस्ट्रेलियात येण्याचे आमंत्रण दिले.

Displaying varshagaiekwadaustraliandelegatemeeting2.jpg

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages