मुंबईच्या झोपडपट्टी भागात हिपेटायटिस जनजागृती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईच्या झोपडपट्टी भागात हिपेटायटिस जनजागृती

Share This
जागतिक हिपेटायटिस दिनाच्या निमित्ताने युनायटेड वे ऑफ मुंबई आणि अमेरिकेअर्स यांनी एकत्रितपणे मुंबईतील झोपडपट्टीवासीयांसाठी हिपेटायटिसबद्दल जनजागृती केली. या उपक्रमास ब्रिस्टॉल मायर्स स्क्विब फाऊंडेशनचे (बीएमएसएफ) सहकार्य होते. २८ जुलै (जागतिक हिपेटायटिस दिन) ते ३ ऑगस्ट २0१४ या कालावधीत मुंबईतील वेगवेगळ्या झोपडपट्टय़ांमध्ये हिपेटायटिसबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात या कार्यक्रमाने करण्यात आली. 
या आठवड्याभरात युनायटेड वे ऑफ मुंबईचे ग्रीन रिबन ब्रिगेडियर्स विविध ठिकाणी जनजागृती करताना दिसणार आहेत. दरवर्षी हिपेटायटिस बी आणि सीचा ५0 कोटी लोकांना संसर्ग होतो, तर अंदाजे दहा लाख लोक मृत्यू पावतात.लोकांमध्ये या आजाराबद्दल जागृती नसल्याचेच हे निर्देशक आहे. अशा उपक्रमांद्वारे आम्ही लोकांमध्ये आपल्या आरोग्याची योग्य काळजी आणि त्यासाठी योग्य निर्णय घेण्याबद्दल जागृती करत आहोत, असे ब्रिस्टॉल-मायर्स स्क्विबच्या कॉर्पोरेट आणि पब्लिक अफेअर्स-फिलानथ्रॉफी विभागाच्या संचालक कांचना टी. के. यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages