अग्निशमन जवानांचे दिल्लीतील जंतरमंतरवर 20 ऑगस्टला धरणे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अग्निशमन जवानांचे दिल्लीतील जंतरमंतरवर 20 ऑगस्टला धरणे

Share This
मुंबई - अग्निशमन दलाला अत्याधुनिक आणि सक्षम करा, दलाच्या प्रश्‍नांसाठी त्रिसदस्यीय समिती नेमा, या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी आणि अधिकारी दिल्लीतील जंतरमंतरवर 20 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करणार आहेत. अग्निशमन दलाचे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी पार पडले, त्या वेळी ही माहिती देण्यात आली. 

नॅशनल फायर फायटर्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि मुंबई फायर सर्व्हिसेस यांच्या वतीने परळच्या शिरोडकर शाळेच्या सभागृहात राष्ट्रीय अधिवेशन भरवण्यात आले होते. त्यास देशाच्या विविध भागांतून अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. अग्निशमन व्यवस्थेची, तेथे काम करीत असलेल्या जवानांची स्थिती, कर्मचाऱ्यांच्या जीविताची सुरक्षा, दुर्दैवी घटना घडल्यास त्यांचे पुनर्वसन, सुरक्षित कामकाज पद्धती, आवश्‍यक असलेली साधन-सामुग्री तसेच दलाच्या एकूण व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमावी, असा ठराव या वेळी संमत झाला. 

समितीचा अहवाल सादर केल्यानंतर त्याची योग्य अंमलबजावणी करावी, केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, सामाजिक सुरक्षा योजना, सवलती, अत्याधुनिक यंत्रसामुग्री तसेच अग्निशमन केंद्रे उभारण्यासाठी आपापल्या अर्थसंकल्पातून पाच टक्के रकमेची तरतूद करावी, असा ठरावही मांडण्यात आला. दरम्यान, अंधेरी येथील लोटस पार्क इमारतीच्या आगीत मृत्यू झालेल्या नितीन इवलेकर या जवानाची पत्नी शुभांगी यांना मुंबई फायर फायटर्स सव्हिर्सेस युनियनच्या वतीने एक लाखाचा धनादेश देण्यात आला. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages