गणेशोत्साव आणि दिवाळीत कमी ऐकू येणाऱ्यांच्या संख्येत 30 टक्‍क्‍यांनी वाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गणेशोत्साव आणि दिवाळीत कमी ऐकू येणाऱ्यांच्या संख्येत 30 टक्‍क्‍यांनी वाढ

Share This
मुंबई - सततच्या गोंगाटामुळे शहरातील ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या आवाजामुळे बहिरेपण आलेल्या रुग्णांच्या संख्येत 20 ते 30 टक्‍क्‍यांनी गेल्या काही वर्षांत वाढ झाली असल्याची स्फोटक माहिती आज उघड झाली आहे. त्यातच गणेशोत्सावातील डीजे, लाऊडस्पीकर आणि दिवाळीच्या फटक्‍यांचे आवाज या बहिरेपणात अधिकच भर घालतात. 
पालिका मुख्यालयात कान, नका घसा रुग्णालयाच्या वतीने आज सादरीकरण करण्यात आले. त्या वेळी रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. दीपिका राणा यांनी मुंबईतील बहिरेपणाची धक्कादायक माहिती दिली. पालिकेच्या या रुग्णालयात दररोज साडेतीनशे रुग्ण येतात. यात अचानक कमी ऐकू येणाऱ्या रुग्णांचा भरणा अधिक असतो. तर गेल्या काही वर्षांत अशा रुग्णांमध्ये 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. त्यातच गणेशोत्सव आणि दिवाळीत होणाऱ्या ध्वनिप्रदूषणानंतर ऐकू कमी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली असते. 

माणूस 50 ते 60 डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करू शकतो. त्यापेक्षा मोठा आवाज असल्यास त्याच्या कानांना अपाय पोचू शकतो, अशी माहिती डॉ. दीपिका राणा यांनी दिली. तर एकाच वेळी 400 किलोवॉटपेक्षा जास्त आवाज असल्यास कायमचे बहिरेपण येण्याची भीती अधिक असते. गणेशोत्सव आणि दिवाळीच्या काळात मुंबईतील ध्वनीची मर्यादा याहून कितीतरी अधिक असते. गणेशोत्सवात विसर्जनाच्या मिरवणुकीत तर डीजे, ढोलताशांमुळे ध्वनिप्रदूषण तर प्रचंड वाढलेले असते.
मोबाईलचा हेडफोन कानाला लावून दिवसभर बोलत बसण्याची सवय अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांना असते. त्याचा थेट परिणाम त्यांच्या कानांवर होऊ लागला आहे. या रुग्णालयात कानाच्या समस्या घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये पाच ते सात टक्के हे विद्यार्थी असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages