पोलिस निरीक्षकाला मारहाण- सोमय्यांविरुद्ध तक्रार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पोलिस निरीक्षकाला मारहाण- सोमय्यांविरुद्ध तक्रार

Share This
मुंबई- मुलुंड भागातील एका पोलिस ठाण्यात जाऊन तेथील पोलिस निरीक्षकाला मारहाण करून धमकावल्याबद्दल भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे खासदार सोमय्या यांच्याविरुद्ध रविवारी रात्री कलम ३३२ नुसार (सरकारी सेवकाला दुखावून कर्तव्य बजावण्यापासून रोखणे), कलम ३५३ (सरकारी सेवकाला मारहाण करणे) आणि कलम ५०६ (धमकी देणे) यानुसार नवघर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलिस उपायुक्त विनय राठोड यांनी सांगितले.पोलिस निरीक्षक संपत मुंडे यांच्याशी नवघर पोलिस ठाण्यात वादावादी करून नंतर त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.  

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages