राम गोपाल वर्माचे विवादास्पद ट्विट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राम गोपाल वर्माचे विवादास्पद ट्विट

Share This


मुंबई  -  चित्रपट निर्माता व दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशीच गणपतीबद्दल वादग्रस्त ट्विट्स करून नवीन वादाला तोंड फोडले आहे. ' जो देव स्वत:चे शीर वाचवू शकला नाही तो इतरांचे रक्षण कसे करेल? हे मला कोणी सांगेल का' असे ट्विट वर्मा यांनी केले आहे.
एवढेच नव्हे तर त्यांनी पुढे असाही प्रश्न विचारला आहे की, ' आजच्या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता की त्याचे शीर उडवण्यात आले होते?' 'गणपती आपल्या हाताने जेवतो की सोंडेने?' असे अनेक वादग्रस्त प्रश्न त्यांनी ट्विटरवर विचारले आहेत.
एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र गणरायाच्या आगमनाचा हा सण आनंद, उत्साहाने साजरा करत असतानाच वर्मा यांच्या प्रश्नांमुळे नवा वाद निर्माण होत असून अनेकांनी त्यांच्या ट्विट्‌सबद्दल नाराजी दर्शवत निषेध नोंदवला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages