म्हाडाचे ३२५ कर्मचारी निवडणुकीच्या कामात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

म्हाडाचे ३२५ कर्मचारी निवडणुकीच्या कामात

Share This
मुंबई : म्हाडाच्या विविध मंडळांतील ३२५ कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात आले असून यामध्ये आणखी कर्मचार्‍यांची भर पडणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी अनेक कर्मचारी हजर नसल्याने गोंधळात भर पडली होती. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणुकीच्या कामासाठी उपस्थित राहण्यासाठी नोटीस पाठवल्यावर अखेर म्हाडा, वीज कर्मचारी, एमएमआरडीए अशा विविध शासकीय संस्थांतील कर्मचार्‍यांनी निवडणुकीच्या कामांसाठी हजेरी लावली आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर म्हाडाच्या ५0 टक्के अधिकारी कर्मचार्‍यांना इलेक्शन ड्युटी लागली आहे. मुंबई मंडळातील ५६८ कर्मचार्‍यांपैकी १४९ तर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातील ३९0 कर्मचार्‍यांपैकी ५0, कोकण मंडळातील सुमारे ४५ व झोपडपट्टी सुधार मंडळातील ७५ असे ३२५ कर्मचारी अधिकारी निवडणुकीच्या कामासाठी कार्यरत झाले आहे. निवडणुकीच्या कामांमुळे म्हाडाच्या सोडतीच्या सर्व प्रक्रियांचा वेग मंदावणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages