राज ठाकरेंच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल - तक्रार दाखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज ठाकरेंच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल - तक्रार दाखल

Share This
मुंबई : फेसबुक, ऑकरुट, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने बनावट अकाउण्ट उघडल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ माजली आहे. राज यांची छायाचित्रे, समाजविघातक लिखाणामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई होण्यासाठी मनसेच्या वतीने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

ट्विटर, फेसबुक, ऑकरुट यासारख्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाची अकाउण्ट उघडण्यात आली आहेत. राज यांच्या परवानगीशिवाय खोट्या अकाउण्ट्सवर राज यांची वैयक्तिक छायाचित्रे प्रदर्शित केली आहेत. या अकाउण्ट्सवरून इतर अकाउण्टधारकांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याकडूनसुद्धा फ्रेण्ड रिक्टेवस्ट स्वीकारल्या जात आहेत. या अकाउण्ट्सच्या माध्यमातून काही व्यक्ती स्वत: राज ठाकरेंशी संवाद साधत आहेत, असे भासवले जात आहे. लोकांच्या प्रतिक्रियांनादेखील उत्तरे दिली जात आहेत. मात्र, ही अकाउण्ट खोटी असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले असून राज ठाकरे यांच्याकडून अशी अकाउण्ट उघडलेली नाही, असे प्रसिद्धीपत्रक काढून स्पष्टकरण्यात आले आहे. 

राज यांच्या नावाचा, छायाचित्रांचा दुरुपयोग होत आहे. राज यांच्याबाबत लिखाण करून समाजविघातक अपशब्द वापरून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम काही व्यक्तींकडून सुरू आहे. त्यांच्याविरोधात कारवाई होण्यासाठी मनसेच्या वतीने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आयटीअँक्टअंतर्गत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या संवेदनशील प्रकरणाचा अधिक तपास सायबर सेलचे पथकही करत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages